बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु
जालना/प्रतिनिधी,दि.8
बदनापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत शाळा प्रवेश देण्यात येत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 25 जून, 2025 पर्यंत मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, ग्रामीण रूग्णालया शेजारी, तहसिल रोड, बदनापूर, जि. जालना यांच्याकडे प्रवेश अर्ज सादर करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. जालना जिल्ह्यातील वरील प्रवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन अनंत कदम, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना व डॉ. दिलीप गिरी, मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर, जि. जालना यांनी केले आहे.