pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

२४ व्या प्रयत्नांत पठ्ठया कर सहाय्यक अधिकारी बनला, माटाळा गावातील पहीलाच अधिकारी

0 1 7 4 0 5

निवघा बाजार/ दिगाबर शिंदे,दि.21

महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या २३ वेळा परीक्षा दिल्या पण अपयश आले परंतू जिद्द चिकटी कायम ठेउन २४ व्या वेळा परीक्षा दिली तेव्हा माटाळा ता . हदगाव येथील सागर शिंदे ला यश आले , एकाच वेळी कर सहाय्यक अधिकारी आणि मंत्रालयात लिपीक पदाची परीक्षा पास झाला या मुळे गावातून आता पर्यंत एवढा मोठा अधिकारी बनल्याने गावात दिवाळी साजरी करण्यात आली . हदगाव तालुक्यातील माटाळा या छोट्याशा जेमतेम ६५० लोकसंख्या असलेल्या गावातील तरुण अभ्यासात सातत्य ठेऊन २३ वेळा अपयश आले तरी हार न मानता जिद्दी ने तो २४ व्या वेळ यशस्वी ठरला . घरात आई – वडील आशिक्षीत भाऊ बारावी पर्यंत शिक्षण करुन तो संसारात रमला वडीला अडीच एकर जमीन याच जमीनीत उत्पन्न काढून वेळ प्रसंगी रोज मजुरी करून मुलाला शिक्षणा करीता पैसा कमी पडू दिला नाही . मुलाने ही आई वडीला च्या कष्टाचे चिज करायचे म्हणून काही तरी अधिकारी बनायचा असा मनात चंग बांधला अन तो अधिकारी झाला , तो कोणता अधिकारी झाला , पद किती मोठे आहे याची आई वडीलाला कल्पना नाही पण माझा मुलगा सरकारी नौकरी ला लागला एवढच काय ते त्यांना माहीत आहे . माटाळा गावत जि . प . ची चौथी पर्यंत शाळा आहे गावतल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले , शिक्षणाची सुविधा नाही म्हणून गावापासून पाच कि मी . अंतरावर असलेल्या पळशी ( ता . उमरखेड ) येथे माध्यमिक शिक्षण झाले तर पदवी पर्यंत चे शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले , आई वडीलांनी काबाड कष्ट करून मुलाला शिक्षणा करीता पैसा पुरवला . त्याच्या यशाने गावात दिवाळी अगोदरच दिवाळी साजरी करण्यात आली . माटाळा या गावात फक्त शासकीय नोकरीत तेही शिक्षक म्हणून तिघे जण आहेत . प्रतिक्रीया :- सागर नानाराव शिंदे सहाय्यक कर अधिकारी लोकसेवा आयोगाच्या मी २३ वेळा परीक्षा दिल्या मला अपयशच आले म्हणून मला नैराश्य यायचे तेव्हा मित्र मंडळींनी मला खूप सपोट केला आणि आई वडीला ची गरीबी व माझ्या करीता किती मेहनत घेतात याची जाणीव ठेऊन मी जिद्द च बाळगली आणि शेवटी २४ व्या वेळा प्रयत्नात एकाच वेळी सहाययक कर (GST ) आणि मंत्रालय लिपीक या दोन पदाच्या परीक्षत मला यश मिळाले , सामाजीक बांधीलकी म्हणून मी मंत्रालय लिपीक या पदाच त्याग केला आहे . तर माझे स्वप्न उप जिल्हाधिकारी बनायचे असल्याचे सागर शिंदे यांनी सांगीतले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे