pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

खेळाडुंनी खेळाकडे करीअर म्हणुन पहावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

0 1 7 4 0 7
जालना / प्रतिनीधी,दि.29
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या मार्फत जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीरास जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दि. 29 डिसेबर 2023 रोजी सकाळी भेट देवून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा संघटक  शेख चाँद पी.जे., क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा परदेशी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा शिक्षक सुभाष देठे, प्रशिक्षक आनंदा कांबळे  यांची उपस्थीती होती.
यावेळी बोलतांना डॉ. पांचाळ यांनी सांगीतले की, खेळाडूंनो  तुम्ही आयुष्याच्या अशा वळणावर आहात की जिथून तुम्हाला करीअर करण्याच्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे, क्रीडा क्षेत्रात सुद्धा आता अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही खेळाला केवळ खेळ म्हणुन बघू नका तर करीअर म्हणुन बघा. यावेळी जिल्हाधिकारी यांनी लॉन टेनीस, बॅडमींटन, क्रीकेट आदी खेळांचा उल्लेख करत बेसबॉल खेळ सुद्धा एक दिवशी याच उंचीवर येईल असा विश्‍वास व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रीय स्पर्धे करिता संघासोबत जाणारे प्रशिक्षक  श्रीमती रेखा धनगर, श्रीमती क्षितीजा गव्हाणे, संघ व्यवस्थापक सोपान शिंदे, राहुल गायके यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रेखा परदेशी यांनी व आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे यांनी केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे