विज्ञान साहित्य कला व संस्कृती यांचा सुरेख संगम विद्यार्थी व विज्ञान प्रेमींसाठी श्रीकांत सरांचे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त विज्ञान प्रदर्शन 2024

जालना/ गौरव बुट्टे,दि.10
जालना येथील हरी ओम नगरी येथे प्रा. श्रीकांत चिंचखेडकर सरांनी यावर्षी गणेशोत्सवात हे एक अविस्मरणीय प्रदर्शन तयार केले आहे. यात श्रीकांत सरांनी भारतातील तसेच जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या मूर्ती ,त्यांची माहिती, साहित्य तसेच विज्ञानातील 200 पेक्षा जास्त सायन्स प्रोजेक्ट वर्किंग मॉडेल तयार केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचा आपला भारतीय वैज्ञानिक इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा व विद्यार्थी वर्गात विज्ञान प्रेम रुजवण्याचा प्रयत्न आहे. यात त्यांनी भगवान धन्वंतरी आर्यभट्ट, रामानुजन ,महर्षी कणाद, पतंजली अल्बर्ट आईन्स्टाईन न्यूटन भास्कराचार्य, डार्विन, जॉर्ज बॅबेज, चरक, सुश्रुत ,नागार्जुन, जीवक, मेंडेल ,मेंडेलीव्ह ,वराहमहिर यासारखे इत्यादी महान शास्त्रज्ञ यांच्या भव्य मुर्त्या व त्यांची माहिती प्रदर्शित केली आहे. याबरोबरच विज्ञानातील विविध सिद्धांतावर आधारित स्वतः वेगवेगळे प्रयोग बनवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. यात चिंचखेडकर यांनी न्यूटनच्या तिन्ही तत्त्व, स्टिम इंजिन चे प्रयोग, पाण्यापासून वीज निर्मिती, कचऱ्यापासून वीज निर्मिती, वाफेचे इंजिन, हवेच्या दाबाचे प्रयोग, गुरुत्वाकर्षण, हायड्रोलिक जेसीबी, ऑक्सिजन सायकल, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोप ,सोलारिक्लिप्स ,ओहम लाख, साइन वेव्ह, डीएनए डायग्राम, यासारखे विविध विविध प्रयोग घरातीलच विविध वस्तू वापरून तसेच काही टाकाऊ वस्तू वापरून तयार केलेले आहेत हे विज्ञान प्रदर्शन त्यांच्या राहत्या घरी हरिओम नगर गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रोड किंग्स कॉलेजच्या बाजूला जुना जालना येथे दसऱ्यापर्यंत म्हणजेच विजयादशमी पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहील तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.