pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता राज्याचा संघ जाहीर

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.4

  क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद , जालना यांच्या वतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दि. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 दरम्यान  आयोजित 17 वर्षा खालील  मुले व मुलींच्या राज्यस्तर  शालेय बेसबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. सदर स्पर्धेतून बिलासपूर, छत्तीसगड  येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे मुला व मुलींचे संघ निवड समिती सदस्य नंदन परब, रेखा धनगर, क्षितिजा गव्हाणे यांनी निवडून जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी उपस्थित सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक यांच्या समोर जाहीर केले.

    यावेळी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे सचिव राजेंद्र इखनवार, तांत्रिक समिती प्रमुख इंद्रजित नितनवार, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे सहसचिव प्रदीप साखरे, जिल्हा असोसिएशन चे सचिव प्रमोद खरात, जिल्हा क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे., बेसबॉल असोसिएशन चे राजेंद्र बनसोडे, नारायण बत्तुले , क्रीडा संघटक विजय गाडेकर, स्पर्धा प्रमुख क्रीडा अधिकारी रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे आदिंची उपस्थिती होती.

निवड झालेला महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे – मुले

कृष्णा सुरवे, तनिष्क शेलार ( जि. व विभाग पुणे ), आदित्य शर्मा ( मुंबई उपनगर, मुबंई ), प्रज्वल पाटील ( जि. व विभाग कोल्हापूर ), अनिल गवळी ( जळगाव, नाशिक ), उजेफ पठाण ( जि. व विभाग लातूर), जीवन तांदळे ( जि. बीड, वि. संभाजीनगर ), संगम घेबाळ ( जि. अकोला, वि. अमरावती ), आदित्य विद्यागर ( जि. बीड वि. संभाजी नगर ), अथर्व खेडे ( जि. सोलापूर वि. पुणे ), अथर्व बत्तुले ( जि. अकोला, वि. अमरावती ), अनिरुद्ध साखरे ( जि. जळगांव वि. नाशिक ), श्रीवर्धन बनसोडे ( जि. व वि. कोल्हापूर ) तनिष्क तायडे ( जि. अकोला वि. अमरावती ), सार्थक गावडे ( जि. व वि. मुंबई ), व्यंकटेश शेटे ( जि. व वि. पुणे )

राखीव – आनंद गाडे ( जि. जालना वि. संभाजीनगर ), यशनीत खंदारे ( जि. सातारा, वि. कोल्हापूर ), आर्यन शेख ( जि. नांदेड वि. लातूर ), तनिष्क दळवी ( जि. व वि. कोल्हापूर ), यश कुरील ( जि. व वि. लातूर )

मुली – आकांक्षा खरबे, योगिता खरबे जिल्हा बीड विभाग संभाजीनगर,  समीक्षा भुरे जिल्हा भंडारा विभाग नागपूर,  ऋतुजा पवार जिल्हा सांगली विभाग कोल्हापूर,  राजनंदिनी कुमदाळे जिल्हा व विभाग लातूर, आदिती सावंत जिल्हा व विभाग मुंबई, काजल पावरा जिल्हा जळगाव विभाग नाशिक, तेजस्वी मुडवे जिल्हा व विभाग लातूर, युक्ती मोटे जिल्हा व विभाग कोल्हापूर, अनिशा देवकर जिल्हा व विभाग पुणे,  अमृता शिंदे जिल्हा जालना विभाग संभाजीनगर, जशीका लोरे जिल्हा अकोला विभाग अमरावती, साक्षी काळे जिल्हा सातारा विभाग कोल्हापूर, कुंजल नितनवार जिल्हा  व विभाग अमरावती, वैष्णवी जोंधळे जिल्हा नांदेड विभाग लातूर,  संजीवनी समदुरे जिल्हा व विभाग अमरावती,

राखीव – प्रांजली शिंदे जिल्हा व विभाग लातूर, दिव्या केदार जिल्हा अहमदनगर विभाग पुणे,  वैभवी कदम जिल्हा सांगली विभाग कोल्हापूर, दिव्या शेंदरे जिल्हा भंडारा विभाग नागपूर,  सपना सूर्यवंशी जिल्हा जळगाव विभाग नाशिक

निवड झालेल्या संघातील खेळाडूंचे जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प. वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र ईखनकर  यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे