गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी कारखान्याने २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे भाव जाहीर केला आहे. सुरुवातीला २ हजार ३०० रुपये प्रती मेट्रिक टन या प्रमाणे पहिला त्यानंतर २०० रुपये प्रति मे. टन प्रमाणे दुसरा तर बैलपोळासणानिमित्त उसाचा वाढीव तिसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.आता दसरा या महत्वाच्या सणासाठी १०० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे उसाचा वाढीव चौथा हप्ता देण्याचा निर्णय समृद्धी कारखान्याने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली.गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी कारखाना मराठवाडयात आघाडीवर राहीला आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याा मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून एक क्विंटल साखर मोफत घरपोच देणारा समृद्धी कारखाना महाराष्ट्रातील पहिला कारखाना आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेले शेतरस्ते खुले करुन देण्याची मोहिम कारखाना स्वखर्चातून राबवत असून, आातापर्यंत १७५ किमीचे रस्ते कारखान्याने तयार केले आहे. याशिवाय समाजातील विविध घटकासाठी समृद्धी कारखाना अनेक योजना राबवत आहे.