माझा बाप्पा इकोफ्रेंडली पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा राजुरेश्वर विद्यालयाचे आवाहन..

अंबड/प्रतिनिधी, दि.5
अंबड तालुक्यातील कर्जत येथील राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वसुंधरा निसर्ग मंडळातर्फे पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडुच्या मातीच्या श्री गणेश मुर्ती निर्मिती, भित्तीपत्रके व आवाहन पत्रके तयार करुन कर्जत, कर्जत तांडा, राजपूत वस्ती,शिराढोण,धनगर पिंपळगाव येथील श्री गणेश मंडळांना वाटप करण्यात आले.
बालपणापासून कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी इकोफ्रेंडली शाडुच्या मातीच्या मुर्ती तयार करण्यासाठी श्री गेंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन आले.
विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक बाप्पांच्या मुर्ती तयार केल्या व घरी स्थापणा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.यावेळी निसर्ग मंडळ सदस्यांनी आवाहन पत्रके तयार केली.
एक गाव एक गणपतीची स्थापना करावी.
नैसर्गिक रंगाचा वापर करून तयार केलेली शाडुच्या मातीच्या मुर्तीची स्थापना करावी.
डी.जे.व कर्णकर्कश आवाज करणारी साधने याद्वारे होणारे ध्वनिप्रदूषण टाळावे.
पारंपरिक मांगल वाद्यांचा वापर करून संस्कृतीचे रक्षण करावे.
गुलाल, रंग हवेत उडवून वायुप्रदूषण करु नये.
निर्माल्य पाण्यात टाकून होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी कंपोस्ट खत तयार करावे.
प्रसाद वाटपासाठी विघटनशील साहित्याचा वापर करावा.
श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांत न करता घरच्या घरी बादली मध्ये विसर्जन करून जलप्रदूषण टाळावे.
इकोफ्रेंडली गणपती मूर्ती व आवाहन पत्रकांचे विमोचन केंद्रप्रमुख श्री गायकवाड सर,श्री विष्णू सर,श्री वादे सर,श्री मुळे सर, प्राचार्य श्री विलास टकले सर, अंकुश वीर,धनाजी जाधव, वसुंधरा निसर्ग मंडळ प्रमुख सचिन टेकाळे, सुनिल चव्हाण, सुंदर बुनगे, ज्ञानेश्वर पैठणे, वैभव मुळी ,अभिजीत उंडे, भिकण कोकणी ,अशोक उगले, मनोहर मिसाळ, विलास घुले ,वाल्मिक सपकाळ ,विष्णू घुगे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.