pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत भक्ती भोईर प्रथम

0 1 1 8 0 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चैमियनशीप ही स्पर्धा उलवे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार तथा ॲथलेटिक्सचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळाराम पाटील यांनी केले. या प्रसंगी रायगड जिल्हा अँथलेटिक्स असोशिएशनचे सचिव प्रविण खुटारकर, दिलीप पाटील,यतिराज पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा जिओ इन्स्टिट्यूट तर्फे भरविण्यात आली होती. या स्पर्धेत एकलव्य अथलेटिक्स अकॅडमी जेएनपीटी – उरणचे विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 18 वर्षा खालील मुलींमध्ये भक्ति विजय भोईर यानी गोळाफेक क्रीडा प्रकारात 8.91 मीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर भाला फेक प्रकारात भक्ति विजय भोईर हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ओम योगेश पाटील यांनी गोळाफेक प्रकारात दुसरा क्रमांक पटकविला आहे. तर दिपराज पाटील यांनी गोळाफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या सर्व विद्यार्थ्यांची नाशिक व रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू राम चौहान, योग शिक्षिका पूनम चौहान, सहाय्यक शिक्षिका गुंजन निसाद, प्रशिक्षक दिपक घरत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सदर विदयार्थ्यावर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 0 7

Related Articles