pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

म्हसरूळ येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत कृषी विभागाचे मार्गदर्शन

0 3 8 6 5 3

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.10

सविस्तर वृत्त असे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये वैयक्तिक लाभाच्या घटकांचे अर्ज दिनांक १८ ऑक्टोंबर २०२५ पासून स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या निमित्ताने ग्रामस्थरीय कृषी संजीवनी समिती म्हसरूळ गावातील शेतकऱ्यांना योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक अधिकारी श्री शरद सहाणे साहेब यांनी म्हसरूळ येथे उपस्थित राहून मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शना मध्ये वैयक्तिक लाभाचे घटक असे की वाणीकी आधारित वृक्ष लागवड, बांबू लागवड, फळबाग लागवड, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, सामूहिक शेततळे, शेडनेट गृह, हरितगृह, गांडूळ खत, नाडेप, विहीर पुनर्भरण ,पाईप ,पंपसंच, बीज उत्पादन, रेशीम उद्योग, शेततळ्यातील मच्छी पालन, शेळीपालन,बीपीएफ पद्धतीने लागवड विजेतपादन इत्यादी योजना विषय सविस्तर मार्गदर्शन केले . कृषी सहाय्यक अधिकारी शरद सहाने यांनी ठिबक सिंचन बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले, याप्रसंगी प्रस्ताविक म्हसरूळ येथील सरपंच मंगेश लहाने यांनी केले. शेतकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच ज्ञानेश्वर शेजुळ यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व अपेक्षा व्यक्त केल्या व वारंवार अशा सभा आयोजित करून कृषी सहाय्यक अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात म्हणून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बैठकीस गावचे प्रथम नागरिक श्री मंगेश लहाने, माजी सरपंच ज्ञानेश्वर शेजुळ , माजी उपसरपंच मनोहर म्हस्के, कडूबा लहाने, शिवाजी बढे, संदीप लहाने, अमोल लहाने, सुनील जाधव ,रविंद्र लहाने, कल्याण लहाने.माजी सरपंच रवींद्र बदर,पत्रकार कृष्णा लहाने,पुरुषोत्तम लहाने,नितीन म्हस्के,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत संजीवनी समिती सदस्य , कृषी सहाय्यक अधिकारी शरद सहाने व शेतकरी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित होते. सभेचे आभार प्रदर्शन माजी सरपंच ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे