राजुरेश्वर विद्यालय नानेगाव च्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले

बदनापूर/प्रतिनिधी, दि.29
राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचे औचित्य साधून काल झालेल्या जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारांमध्ये आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा दिनेश सिनगारे वर्ग 11 वी विज्ञान वयोगट 17 वजन गट 60 या प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळून विभागीय स्तरावर तिची निवड झाली.कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर यांनी खेळाचे महत्व व श्रद्धा दिनेश शिनगारे या विद्यार्थिनीने तिचे क्रीडा शिक्षक व आई-वडिलांच्या प्रयत्नामुळे रोज कसरत करून विभागीय स्तरापर्यंत मजल मारली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी या विद्यार्थिनीचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात आपणही राज्यस्तरापर्यंत क्रीडा क्षेत्रात यश संपादन करू यासाठी प्रयत्न करावे. याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव मा.डॉ.राहुल पाटील डोंगरे,आमचे मार्गदर्शक पांडुरंग तात्या डोंगरे,विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनीचा सत्कार करून विभागीय स्तरावर तिचा विजय होऊन राज्य स्तरावर तिने चांगली यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा दिल्या.