pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

0 1 7 4 7 6

जालना/प्रतिनिधी,दि.15

जिल्ह्यातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता राज्य सामाईक प्रवेश परिक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. या प्रवर्गातील बारावी व बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासुन वंचित राहतात. तरी ही बाब विचारात घेवून दि. 12 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी विहित वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी ज्या जिल्हयातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता त्वरित अर्ज सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा व त्याची एक प्रत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी. ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेत व ज्यांना समितीने ऑनलाईन त्रुटी कळविल्या आहेत, अशा अर्जदारांनी अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे