pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सरपंच चषक २०२५ चे आयोजन, शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती.

0 3 2 6 6 6

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

उरण तालुक्यातील
जासई ग्रुप ग्रामपंचायतचे थेट सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र घरत यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबा क्रिकेट क्लब,जासई यांनी “सरपंच चषक-२०२५” चे आयोजन केले होते. या सामन्याना शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट देऊन श्री.संतोष घरत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. सरपंच कसा असावा याचे एक आदर्श उदाहरण म्हणजेच श्री.संतोष घरत. ग्रामपंचायत मध्ये पारदर्शक आणि विकासात्मक कारभार करण्यामध्ये त्यांचा नेहमीच कल असतो.
साई गणेश मित्र मंडळ, गव्हाण यांच्या माध्यमातून महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती आयोजित “साई गणेश चषक-२०२५” आयोजन करण्यात आले होते. पाटणे मैदान, गव्हाण कोळीवाडा येथे या भव्य प्रकाश झोतातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाला शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून मर्यादित क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेतला.
आपण ज्या गावात मोठे झालो त्याच गावात प्रमुख पाहुणे म्हणून आपण जातो त्यावेळी मनात एक उत्साह असतो. दोन्ही ठिकाणी सामन्यांचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्तम रित्या केले होते त्याबद्दल खंडोबा क्रिकेट क्लब,जासई आणि साई गणेश मित्र मंडळाचे अभिनंदन करून उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नरेश शेठ घरत, सचिन घरत, माणिकशेठ म्हात्रे, सतीश शेठ घरत,हेमंत पाटील, गणेश पाटील,वीना घरत, रवी घरत, दत्ता घरत, संतोष आत्माराम घरत, मिलन घरत,समित पाटील, रामकिशोर ठाकूर, पुष्पा म्हात्रे,अश्विनी नाईक, जयश्री घरत, ऋतूजा घरत, पुजा कांबळे,सृष्टी म्हात्रे, निराबाई म्हात्रे, वंदना पाटील, योगिता म्हात्रे, किशोर कोळी, राजू कोळी, विशाल कोळी, अरुण पाटील उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे