उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी,दि.14
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 9.40 वाजता श्रध्दा एनर्जी व इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. बागेश्वरी साखर कारखाना येथील हेलिपॅड, युनिट नं.1, वरफळ, ता. परतुर, जि. जालना येथे आगमन व राखीव. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता स्व. कन्हैयालाल जेथलिया नगर परिषद, क्रिडा संकुल, परतूर, जि. जालना येथे आगमन व माजी आमदार सुरेश जैथलिया यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच दुपारी 2.20 वाजता श्रध्दा एनर्जी व इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. बागेश्वरी साखर कारखाना येथील हेलिपॅड, युनिट नं.1, वरफळ, ता. परतुर, जि. जालना येथून दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.