विदर्भ स्तरीय सर्व शाखीय सोनार समाज महासम्मेलन
बहुसंख्येने सामील होऊन सोनार ऐक्याचे दर्शन घडवावे.

वृत्तसंकलनः आत्माराम ढेकळे,पुणे,दि.9
पुणेः- सोनार समाजात विविध शाखा असुन समाज विखुरलेला आहे.यासाठी “सोनार जोडो अभियान”अंतर्गत ‘सन्मान कर्तुत्वाचा ‘या विषयान्वये विदर्भ स्तरीय सर्वशाखीय सोनार समाज महासम्मेलन आॕल इंडिया सोनार फेडरेशन व सोनार विकास प्रतिष्ठान,मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ एप्रिल २०२३ रोजी मेहकर जि.बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोनार समाज महा सम्मेलनाचे आयोजन ‘कृषि वैभव लाॕन ,डोणगाव रोड ,मेहकर ,जि.बुलडाणा येथे आहे. या सम्मेलनात प्रथम व द्वितीय सत्र होणार असुन त्यामध्ये प्रथम सत्रात कार्यक्रमाचे उद् घाटन ,विशेष मार्गदर्शन तर द्वितीय सत्रात भाग्यवान महिलांना भेट वस्तु वाटप तसेच या कार्यक्रमात प्रामुख्याने ‘सन्मान कर्तृत्वाचा या विषयान्वये सोनार समाजातील निवडक सेवकांना “सेवाव्रती पुरस्कार “देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.हे या सम्मेलनातील विशेष आकर्षण आहे. तसेच याच कार्यक्रमात ‘आपातकालीन वैदकीय सेवानिधी शुभारंभ,संत नरहरी महाराज “कन्यादान “योजना शुभारंभ चे आयोजन आहे. या भव्य मेळाव्यात फेडरेशन व समाज मंडळ,प्रतिष्ठानचे पदाधिकारी,मुख्य ट्रस्टी यांचा स्वागत समिती मध्ये समावेश आहे.तसेच प्रसिद्धी सहयोग मध्ये प्रसिध्द पत्रकार व न्यूज चॕनेलच्या संचालकांचा सहभाग आहे.सकाळी १०वा.या सम्मेलनाचा प्रारंभ असुन दुपारी स्नेह भोजनाचे देखील आयोजन आहे.
या विदर्भ स्तरीय सर्व शाखीय सोनार सम्मेलनास मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी राज्यातील समस्त सोनार समाजास निमंत्रित करण्यात येत आहे.सोनार समाजाच्या एकजुटीचे सुवर्ण प्रदर्शन येथे होणार आहे. यासाठी सर्व शाखीय सोनार समाजातील व्यक्तींनी या सम्मेलनास हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.असे आॕल इंडिया सोनार फेडरेशन आणि सोनार विकास प्रतिष्ठान,मेहकर च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.