pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुप चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

ही दोस्ती तुटायची नाय! ३१ जणांची उपस्थिती

0 3 2 1 7 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचा स्नेहमेळावा चिरनेर हायवे येथील गजानन फोफेरकर यांच्या समर्थ कृपा या निवासस्थानी बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी मित्र मैत्रिणी यांनी आणलेले द्राक्षे ,खजूर, फरसाण सर्वांनी आवडीने खाल्ले.यावेळी शालेय आठवणीना उजाळा देण्यात आला.४० वर्षापूर्वीच्या सोनेरी आठवणीत ..भूतकाळात सर्व दंग झाले होते.मैदानावर खेळलेले कबड्डी, खो..खो , शाळेतील निरोप समारंभ बोर्डाची परीक्षा, निकालाची धाकधुक शाळेतील गोड आठवणीना उजाळा देऊन गप्पांची छानशी मैफिल रंगली होती.
उपस्थित महिला भगिनीचे हळदीकुंकू झाले.
यावेळी गजानन फोफेरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यानंतर ग्रुपमधील हास्यसम्राट संजय मोकल याने सर्वांना पोट धरून हसवले.
या ग्रुपमधील अनेक जण उच्चपदस्थ आहेत.मात्र मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर एकत्र येताना सर्वजण समानच असतात.इथे ना कोणी मोठा आणि ना कुणी लहान.
ग्रुपमधील आचारी दिपक म्हात्रे, विजय पाटील,प्रकाश फोफेरकर यांनी बनविलेले स्वादिष्ट, रुचकर आणि झणझणीत मटण आणि भाकरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला.
वयाच्या ५५ वर्षी या जिगरबाज दोस्तांचा उत्साह पाहून उमर पचपन .. दिल बचपन या वाक्याची आठवण झाली.वयाची ५५ वी ओलांडलेले आणि आजीआजोबा झालेले अनेक जण या ग्रुप मध्ये आहेत.
प्रत्येक सहलीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किमान एक किल्ला हे मित्र पाहतात. आणि विशेष म्हणजे कोणताही किल्ला ते एका दमात चढून जातात.नियमित योगा, व्यायाम आणि योग्य आहार हे या मित्रांच्या फिटनेस चे रहस्य आहे.
२०१८ साली व्हॉट्स ॲप च्या माध्यमातून या ग्रुपमधील मित्र मैत्रिणींस एकत्र आणण्याचे काम या ग्रुपचे ॲडमिन श्री मिलिंद खारपाटील यांनी केले
यानंतर गेली काही वर्ष स्नेह मेळावा, ऐतिहासिक सहली, वृक्षारोपण आदींचे आयोजन करण्यात आले. या ग्रुपचा आदर्श समोर ठेवून चिरनेर परिसरातील अनेक ग्रुपचे स्नेह मेळावे झाले.
आनंदाच्या क्षणाला जसे एकत्र येतात. तसेच एकमेकाच्या अडचणीला ,संकटात हे मित्र धाऊन जातात.
या स्नेह मेळाव्यासाठी मिलिंद खारपाटील, चंद्रहास म्हात्रे,पद्माकर फोफेरकर ,सूर्यकांत म्हात्रे, प्रकाश फोफेरकर, प्रकाश नारंगीकर, पंढरीनाथ नारंगीकर, सुभाष पाटील, बाळकृष्ण पाटील ,रोहिदास पाटील, हिरामण जोशी, राजेंद्र मुंबईकर,विजय पाटील ,उपकार ठाकूर,विजय मुंबईकर, गजानन फोफेरकर,संजय मोकल , दिपक म्हात्रे, चंद्रकांत गोंधळी,रोहिदास ठाकूर,विलास हातनोलकर, प्रमोद चिरनेरकर,रवींद्र पाटील, जगदीश घरत, जयवंत नाईक, प्रदेवी पाटील,मालती भगत,चंद्रप्रभा ठाकूर, मीना परदेशी,सुरेखा पाटील,सुवर्णा म्हात्रे असे २५ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
घरी परतताना सर्वांनी एकमेकांना साश्रू नयनांनी निरोय दिला.
या मित्रमैत्रिणींच्या मैत्री बद्दल असे म्हणावेसे वाटते की,
ही दोस्ती तुटायची नाय!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे