छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोफत मेंदू व मणका विकार आजाराचे शिबिर संपन्न.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.8
छत्रपती संभाजीनगर, डॉ. आकाश खरात यांचे Synapse न्यूरो केअर सेंटर , सिडको बस स्टॅन्ड जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मेंदू विकार व मणका शिबिराचे आयोजन दिनांक 04 मार्च व 05 मार्च 2024 रोजी करण्यात आले होते, हे शिबिर अत्यंत कमी दरात आयोजित करण्यात आले होते आणि या शिबिरामध्ये अत्यंत कमी शुल्कामध्ये MRI, EEG सारख्या महागड्या तपासण्यावर 50% पेक्षा जास्त सवलत देण्यात आली तसेच हाडांची ठिसूळता तपासणी व नसांची तपासणी ही मोफत करण्यात आली. या शिबिराचा फायदा हा गरजू व गोरगरीब रुग्णांना झाला. दीडशे च्या वरती रुग्णांनी उपस्थित राहून शिबिराचा फायदा घेतला, यामध्ये पक्षघात अर्थातच पॅरालिसीस, फीट्स, विसरभोळेपणा,पार्किन्सन अशा विविध आजारांच्या रुग्णांना मोफत तपासण्या देत नामांकित कंपन्याचे औषधी ही निःशुल्क देण्याचं कार्य डॉ. आकाश खरात यांनी केले.
सदरील शिबिरास डॉक्टर आकाश खरात आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफ ने भरपूर मेहनत घेऊन रुग्णांना उपचार अत्यंत कमी दरात देऊन मदत केली.