जुना जालना भागातील भाग्यनगरातील संस्कार
प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक व पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आली होती.सदर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग पाचवीचे गुणवंत विद्यार्थी पार्थ दत्ता खारतुडे जिल्ह्यातून ३ रा,अखिलेश अविनाश सांगळे जिल्ह्यातून ५ वा,शौर्य दीपक लोदवाल जिल्ह्यातून १४ वा ४, अलाप प्रसाद मुळे जिल्ह्यातून ३९ वा,शौर्य सुनील कायंदे जिल्ह्यातून ६४ वा, प्रेरणा पांडुरंग शिंदे जिल्ह्यातून ७२वी,रेणुका प्रदीप काळे जिल्ह्यातून ७३ वा, मोहित अविनाश पिसे जिल्ह्यातून
७४ वा ९, वेदा विवेक कुलकर्णी जिल्ह्यातून ८६ वी १०, अर्णव सुभाष देशमुख जिल्ह्यातून ९९ वा ११, अनुज प्रमोद गायकवाड जिल्ह्यातून ११० वा आला आहे.
वर्ग आठवीचे गुणवंत विद्यार्थीमध्ये वेदा राजू ठोंबरे जिल्ह्यातून ५ वी,ध्रुव अर्जुन निकम जिल्ह्यातून ६ वा, राशी राजू जगताप जिल्ह्यातून ७ वी,ओम कृष्णा माने जिल्ह्यातून २४ वी,श्रेयस भूषण कुलकर्णी जिल्ह्यातून २६
वा ७,विद्या दिनेश जोशी जिल्ह्यातून २८ वी, तनवी महेंद्र सोनवणे जिल्ह्यातून ३९ वी, श्रीश दीपक चिंचाने जिल्ह्यातून ९ वा १०,अक्षय राजेश कुलकर्णी जिल्ह्यातून १३ वा, पलक संदीप खिरे जिल्ह्यातून १५वा,ज्ञानेश्वरी रमेश कांबळे जिल्ह्यातून २२ वी,विराज भाऊराव कुदळे
जिल्ह्यातून ३४ वा,सुयोग सुहास सदावर्ते जिल्ह्यातून ३५ वा,शताक्षी सचिन शहापुरे जिल्ह्यातून ४० वी, सोहम शामराव देशमुख जिल्ह्यातून ५१वा,चिन्मय
शिरीष कुमार कस्तुरे जिल्ह्यातून ७४ वी या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या गुणवंताचे संस्थेचे पदाधिकारी सुरेश कुलकर्णी, विजय देशमुख, केशरसिंह बगीरीया, विनायकराव देशपांडे, डॉ. जुगलकिशोर भाला, डॉ. दीपक मंत्री,शाळेचे मुख्याध्यापक रिमा पोळ, ईश्वर वाघ यांनी या गुणवंतांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा विभागप्रमुख भागवत मराठे,रशीद तडवी, बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
—————————————————————-
७-जुना जालना भागातील भाग्यनगरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धा
परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या
वतीने सत्कार करण्यात आला.