जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक
विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संचालक विनायकराव मामा देशपांडे, भास्करराव
काळे,मुख्यााध्यापक ईश्वर वाघ आदींची उपस्थिती होती.
विनायकराव देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. तसेच यशस्वी होण्यासाठी चांगल्या गोष्टी सातत्याने अंगीकारून प्रत्येक पाऊल
विचारपूर्वक टाकल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले.पुढे बोलताना विद्यार्थ्यांनी शरीर सुदृढ ठेवल्यास मन चांगले राहते आणि यातून
आपल्या हातून देशसेवेच चांगलं कार्य घडू शकते. असे ते म्हणाले. ज्येष्ठ संचालक भास्करराव काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे गेले पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपला स्वभाव, दैनंदिन सवयी फार महत्त्वाच्या आहे,यातून आपण यश मिळू शकतो यावेळी थोर शास्त्रज्ञ मायकेल
फॅरेडे रोज पुस्तक वाचायचे आणि प्रयोग शाळेत रात्री प्रयोग करायचे याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सवयी चांगल्या असल्या पाहिजे.यातून
यश मिळवता येते.यावेळी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.विद्यार्थ्यांमधून वेदा ठोंबरे,ध्रुव निकम,तन्वी सोनवणे,नंदिनी कल्याणकर
आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक रामदास कुलकर्णी, किरण धुळे, रशीद तडवी, रेखा हिवाळे, शारदा उगले दहिभाते,शरयू
देशमुख,राजश्री भाले,राहुल घोलप,घनश्याम माळी, शिक्षकेतर कर्मचारी नितेश काळे पवन साळवे आदींसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित
होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा हिवाळे तर आभार प्रदर्शन शरयू देशमुख यांनी मानले