pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संसाधन व्यक्ती पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0 1 2 1 0 2

जालना/प्रतिनिधी,दि. 30

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासुची तयार करावयाची आहे.  तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि.9 जून 2023 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाने सादर करावेत.
संसाधन व्यक्ती पदासाठी सर्व प्रकारच्या पदवीधारकांना  आणि ज्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे ज्ञान व अनुभव असलेली व्यक्ती असावी. अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन,वृध्दी नवीन उत्पादन विकसित करणे, उत्पादकांच्या गुणवत्तेची हमी अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात 3 ते 5 वर्षाचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सुचना, सविस्तर पात्रता, परिश्रमीक मानधन व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना कार्यालयात व जालना जिल्ह्याच्या jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 2