क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, प्रशिक्षक क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4
गोरक्षनाथ मंदिर सभागृह वहाळ, तालुका पनवेल येथे उत्तमरावजी ढीगले स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक, फेन्सिंग असोसिएशन रायगड, व रायगड जम्पर ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा शिक्षक यांना स्फूर्ती मिळण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी व जास्तीत जास्त खेळाडू तयार करून रायगड जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी विविध खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या क्रीडा शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात विविध शिक्षकांचा समावेश होता.रायगड जिल्ह्यातील ८० क्रीडा शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान प्रदान करण्यात आला.त्यामध्ये गोशिन रियू कराटे असोसिएशनच्या चार प्रशिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिहान राजुकोली , गोपाल दिनकर हात्रे, अमिषा अरुण घरत, प्रतीक गणेश म्हात्रे , रोहित घरत यांचा समावेश यात आहे. यावेळी स्व. उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव ढिगले,सरचिटणीस दिपक निकम,फेन्सिंग असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष सुवर्णा काकडे,सचिव मिलिंद ठाकूर, जम्परोप असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष अजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.पुरस्कार प्राप्त सर्व उमेदवारांवर सर्वच स्तरातून कौतुक, शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.