श्री गणेश विद्यालयात 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप
कार्यक्रमासाठी श्रीदत्त भांडवलदार हेड ऑफ इक्वीटी कॅनेरा रोबेको म्युच्युअल फंड यांची प्रमुख उपस्थिती

छ. संभाजीनगर/ कृष्णा घोडके,दि.25
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील नामांकित
श्री गणेश विद्यालयात कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड तर्फे 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्रीदत्त भांडवलदार हेड ऑफ इक्वीटी कॅनेरा रोबेको म्युच्युअल फंड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री गणेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उत्तमराव काळवणे हे होते तसेच मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रकाश भांडवलदार,सचिव एल. डी.भांडवलदार ,संस्थेचे पदाधिकारी अजित कुमार पापडीवाल, प्रभाकर सोनवणे ,सुकलाल भैया अहीरे, मच्छिंद्र नाना काळे, शालेय समिती अध्यक्ष सुभाषराव भांडवलदार, नानाभाऊ भांडवलदार, विश्वासराव भांडवलदार सौ. लीलाबाई लक्ष्मणराव भांडवलदार,श्री आसारामजी भांडवलदार वरिष्ठ महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सर्व प्रमुख उपस्थितांचे मुख्याध्यापक आर.एस. पांडे सर उप- मुख्याध्यापक मोरे सर, उपप्राचार्या श्रीमती बडदे मॅडम, कोल्हे सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.एस. पांडे सर यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
श्रीमती.एस .बी. घोंगडे मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुणे श्रीदत्त भांडवलदार यांचा परिचय दाबके सरांनी करून दिला. प्राचार्य डॉ आघाव सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी कॅनरा रोबेको चे हेड श्रीदत्त भांडवलदार सर यांनी कंपनी आणि सी एस आर संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे कोषाध्यक्ष पापडीवाल सर यांनी केले.कार्यक्रमाचे आभार सुभाष पवार सरांनी मानले.