जालना जिल्ह्यामध्ये बनावट भन्ते म्हणून फिरणार्या व बौध्द धम्म मान्य असल्याचे सांगून बौध्द भिख्खूचे चिवर परिधान करुन अवमान करणार्या कश्यपली वर कारवाई करावी अशी मागणी सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता भिख्खू संघ आणि बौध्द समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन कायदेशी करावाई करण्याचे निवेदनही देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी कश्यपली हे स्वतःला बौध्द भिख्खू म्हणून घेत फिरत असून तरुणांना हिंसेच्या मार्गावर नेत आहेत. त्यांनी तरुणांची डोके भडकवण्याचे काम सुरु केले आहे. हातात शस्त्र घेऊन ते हिंसेचे समर्थन करीत असून बौध्द धम्म हा हिंसेचे समर्थन करीत नाही. शिवाय दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न कश्यपली निर्माण करीत असल्याचेही निवेदनात म्हटलंय. यावेळी भंते शिवली शाक्यपुत्र, भन्ते रेवत, भन्ते धम्मदीप, भन्ते चंद्रमणी, अॅड. रिमा काळे-खरात, बबन मगरे, राजेश राऊत, संदीप खरात, महेंंद्र रत्नपारखे, संजय हेरकर, राजेश सदावर्ते, विशाल सोनवणे, अलोक सरवडीकर, गौतम वाघमारे, प्रदीप रत्नपारखे, मनोज भिसे, सागर नक्का, दीपक रत्नपारखे, विश्वजीत खरात, समाधान रत्नपारखे, राहुल रत्नपारखे, बबलू साळवे यांच्यासह सकल बौध्द समाजातील नागरिक उपस्थित होते.