ब्रेकिंग
1 मे महाराष्ट्र दिन समारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
0
1
7
9
0
2
जालना/प्रतिनिधी,दि.30
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावरील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालायाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी 7.15 वाजता होईल. तरी ध्वजारोहणाच्या समारंभासाठी नागरिकांनी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे.
0
1
7
9
0
2