pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जालना येथे 11 एप्रिल रोजी व्याख्यानाचे आयोजन

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि. 6 

जिल्ह्यात सामाजिक न्याय समता पर्व अभियानाअंतर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. दि.11 एप्रिल 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त उप प्राचार्य बी.वाय.कुलकर्णी यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील काम करणारे मान्यवर, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles