ओम शांती विद्यालय शहापूर येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा
25 वर्षांपूर्वी च्या विद्यार्थ्यांचे होणार मनोमिलन!
अंबड/ तनवीर बागवान,दि.12
अंबड तालुक्यातील शहापुर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक ओम शांती विद्यालयाला २५ वर्ष पुर्ण झाल्याने शाळेत रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सन १९९८ ते २०२२ पर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आई वडिलानंतर शाळा हि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील संस्कारांची शिदोरी असते.या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शिक्षण,राजकारण,उद्योग,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शाळेत केलेली मस्ती,एकत्रितपणे केलेला अभ्यास,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक,शाळेतील क्रीडा स्पर्धा,शिक्षकांनी दिलेली शिक्षा,स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून आपले मनोगत व्यक्त केले.
या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो.हे विसरून गेले होते.यावेळी शाळेविषयी आपुलकिची भावना म्हणुन अनेक विद्यार्थ्यांच्या बॅचने शाळेसाठी स्नेह म्हणून भेट वस्तू दिल्या.तसेच धाकलगाव येथील मंन मंदिर अनाथ आश्रमास रोख रकमेच्या स्वरुपात मदत केली.शाळेसाठी वेगवेगळे उपक्रम शिवाजी देवकर हे घेत असतात.अशाच एका उपक्रमापैकी ही एक त्यांची संकल्पना आहे.यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष विश्वजीत खरात,शाळेचे प्रशासकीय अधिकारी बी.पगारे शाळेतील शिक्षकवृंद सह माजी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.