ब्रेकिंग
18-जालना लोकसभा मतदारसंघ निवडणूक निरीक्षक जनरल म्हणून राजेश कुमार यांची नेमणूक
0
3
1
4
2
5
जालना/प्रतिनिधी,दि.25
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 18 -जालना लोकसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक जनरल म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा 2001 बॅचचे आय. ए. एस. अधिकारी राजेश कुमार यांची नेमणूक केली आहे. राजेश कुमार हे शासकीय विश्रामगृह, जालना, सर्वे क्रमांक 488 येथील ‘हिमालय’ या कक्षात उपलब्ध असणार आहेत. त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. त्यांच्याशी संपर्क करावयाचा झाल्यास 9529493774 या मोबाईल क्रमांकावर करावा, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.
0
3
1
4
2
5