pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शासकीय तंत्रनिकेतनला मिळाले एनबीए मानांकन

0 1 7 4 7 7

जालना/प्रतिनिधी,दि. 3 

 शासकीय तंत्रनिकेतन जालना या संस्थेतील रसायन अभियांत्रिकी विभागास एनबीए मानांकन प्राप्त झाले असून शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ते 30 जुन 2027 पर्यंतचे एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे.  सदर मानांकनाकरीता कमिटी फेब्रुवारी महिन्यात दि. 16, 17, 18 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेत भेट देऊन गेली व या मानांकनाचा निर्णय 26 मार्च 2024 रोजी संस्थेस कळविला आहे.

एनबीए मानांकन प्रक्रियेकरिता संस्थेतील रसायन अभियांत्रिकी विभागाची तयारी मागील 3 वर्षांपासून अविरत चालू होती. तसेच सदर प्रक्रियेकरिता रसायन अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रभारी प्राचार्य डॉ. निनाद रा. जावडे यांचे विशेष पुढाकार, सहकार्य, व कुशल नेतृत्व लाभले तसेच संस्था स्तरावरील एनबीए प्रभारी अधिकारी अभय जोशी, आकांक्षा जाधव, विभाग स्तरावरील एनबीए प्रभारी अधिकारी जी. के. देशपांडे, व रसायन विभागातील अधिकारी, प्राध्यापक वृंद जे.के पोहनेरकर, सी.बी.मोहोड, एस.एस.हराळ, श्रीमती एस. के. वाघमारे, श्रीमती ए.ए. शेख व कर्मचारी ए.बी.पांगारकर, वी.एच.अग्रोल यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, तसेच प्रबंधक शंकर पंडित, व संस्थेचे माजी वि‌द्यार्थी, पालक, व उ‌द्योजकांचे एनबीए मानांकन प्रक्रियेकरिता योगदान होते व त्या सर्वांचे प्राचार्यांनी आभार मानले.  संस्थेला एनबीए मानांकन मिळाल्यामुळे समाजातील विविध स्तरातून व विद्यार्थी पालक वर्ग यामधून अभिनंदन होत आहे. तसेच सदर मानांकानामुळे संस्थेतील वि‌द्यार्थी व परिसरातील विद्यार्थी यांना नक्कीच फायदा होणार आहे. सदर एनबीए मानांकनामुळे रसायन अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम 2024-27 या काळात जे विद्यार्थी पूर्ण करतील त्यांना जगामध्ये कुठल्याही देशात तसेच मोठ्या उ‌द्योगांमध्ये चांगल्या नोकऱ्यांची संधी प्राप्त होणार आहेत.  असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे