करंजा कोंढरीपाडा भाविक भक्तांनी सुरु केले श्री हनुमान मंदिरात अखंड नाम जप.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
दिनांक 6 मे 2023 रोजी उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाड्यातील श्री हनुमान मंदिरात मुर्तीची विटंबणा एका समाजकंटकानी केली आहे. त्याबद्दल उरण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे.गुन्हा नोंद होऊन सुद्धा सदर व्यक्तीवर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. त्या व्यक्तीवर त्वरित कायदेशीर कारवाई करून अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ, भाविक भक्त करत आहेत.सदर हनुमान मूर्तीची विटंबणानंतर कोंढरी ग्रामस्थांनी ब्राह्मणांच्या सल्ल्यानुसार दिनांक 15 मे 2023 पासून अखंड ॐ श्री हनुमंताय नमः हा जप अखंड चालू केला आहे.त्यानंतर देवाचा आभिषेकही करण्यात येणार आहे.विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर कोणतेही कारवाई होत नसल्याने उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाडा ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.