जागतिक आदिवासी दिन किनखेडा येथे साजरा.

जालना/श्याम गिराम,दि.12
मंठा तालुक्यातील किनखेडा येथे रविवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसूर्य बिरसा मुंडा,राघोजी भांगरे,विर एकलव्य यांना अभिवादन करण्यात आले.उपस्थित ग्रामस्थ व कर्मचारी मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतिसूर्य बिरसा मुंडा,राघोजी भांगरे,विर एकलव्य,सोमा डोमा आंध,संत फुलाजी बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम मेटकर व ग्रामस्थांच्या वतीने भव्य व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून आदिवासी चळवळीचे खंदे समाज सेवक चिंतामण मिरासे नायब तहसीलदार व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्यध्यक्ष नारायण माहोरे,आदिवासी चळवळीत सद्यव अग्रेसर असणारे युवा समाज सेवक नितीन दुभळकर,आदिवासी सेल महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माधवराव घोगरे,राजेश्वर कऱ्हाळे व तसेच युवा वर्गांचे आयकॉन आदिवासी रावण साम्राज्य परभणी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ ढाकरे,डॉ.गोविंद नवले,व तसेच मंठा तालुक्यामधील युवा नेतृत्व अमोल दुभळकर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जालना जिल्हा युवा अध्यक्ष,गजानन कऱ्हाळे,पांडुरंग टार्फे,सारंग नवले,पिंपराळा गावचे सरपंच शिवाजी चाफे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्मचारी बांधव व नळडोह पाडळी दुधा अंबोडा कदम मेसखेडा भजी,बोरगाव,नायगाव, दहिफळ खंदारे,गडदे पांगरा, बोरगडवाडी छापणार,धानोरा,कुऱ्हाडी ब्राह्मणगाव,माणकेश्वर व जिंतूर या गावातील आदिवासी बांधव,विविध क्षेत्रातील कर्मचारी,शिक्षक बुरकुले, खुडे,बेले,डुकरे,ठाकरे,शेळके,वानोळे, नाईक,कोकाटे उपस्थित होते.