सुधीर घरत यांनी ३० विद्यार्थ्यांचे शालेय फी भरून जपली सामाजिक बांधिलकी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
सुधीर घरत सामाजिक संस्थेतर्फे आजपर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करण्यात आली. सुधीर घरत सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा कामगार नेते सुधीर घरत यांनी सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल करंजा शाखेतील गोर गरीब, होतकरू, गरजू ३० विद्यार्थ्यांची एकूण शैक्षणिक ३४, ५०० (चौतीस हजार पाचशे )भरून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. सुधीर घरत हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून ते रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघटना फुंडे कॉलेजचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत.त्यांच्या या आदर्श व प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर आर्थिक मदत सुधीर घरत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील, कार्याध्यक्ष जयप्रकाश भोईर,सेक्रेटरी संकेत कडू,वैष्णवी सुधीर घरत यांनी द्रोणागिरी हायस्कूल करंजाचे प्राचार्य सुरेखा म्हात्रे यांच्याकडे सुपूर्त केले.गोरगरीब होतकरू,गरजू विद्यार्थीचे फी सुधीर घरत यांनी भरल्याने गोर गरीब,गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना पुढील चांगले शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे द्रोणागिरी हायस्कूल करंजाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यांनी कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुधीर घरत व त्यांच्या सुधीर घरत सामाजिक संस्थेचे, पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.