“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभासाठी खाते उघडण्याचे डाक विभागाकडून आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.3
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णयानूसार ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यात आली आहे. पोस्ट खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थी पोस्ट ऑफिस बचत खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक अकाऊंट आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधे उघडून या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम खात्यात जमा केली जाईल. तरी जालना जिल्ह्यातील सर्व डाकघर आणि शाखा डाकघरमध्ये खाते उघडून ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.