pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महावाचन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

0 3 8 6 5 3

बदनापूर : गटसाधन केंद्र येथे शुक्रवारी दि. ११ जुलै रोजी तालुकास्तरीय महावाचन स्पर्धा २०२४-२५ च्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय महावाचन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रेरणादायी पुस्तकाचा संच भेट देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, गटसमन्वयक बाबासाहेब जुंबड, केंद्रप्रमुख विकास पोथरे, गिराम गणेश, बालाजी मदन, मीरा जगदाळे, तुकाराम गीरशेट्टी, पिंपराळे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील शिवांजली शिंदे (प्रथम), कुणाल खोकड (द्वितीय), अपेक्षा निकम (तृतीय), इयत्ता ६ ते ८ वीमध्ये गौरी बोरुडे (प्रथम), प्रिया मुळक (द्वितीय), सिपा शेख (तृतीय) तर इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये गायत्री शिंदे (प्रथम), भाग्यश्री जैवाळ (द्वितीय), शेजुळ गायत्री शिंदे (तृतीय) क्रमांक पटकावला आहे. या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे