जालना शहरात प्रभाग क्रमांक 22/23 मधील विकास कामामुळे प्रभागाची आदर्श प्रभागाकडे वाटचाल- एडवोकेट श्री शैलेश देशमुख

जालना/प्रतिनिधी, दि.27
प्रभाग क्रमांक 23
शिवनेरी नगर येथे नगरसेविका संध्या देठे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलिततोउत्तर योजना अंतर्गत भूमिगत गटार अंडरग्राउंड नाली व टिमिक्स सीसी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट शैलेश देशमुख यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी एडवोकेट शैलेश देशमुख यांनी बोलताना सांगितले की प्रभागाच्या कार्यक्षम कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ संध्या देठे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभागात नागरी मूलभूत सुविधांची कामे पूर्ण होत आहे.
अंडरग्राउंड नाली टिमिक्स रस्ते एलईडी लाईट पिण्याचे पाणी आधी समस्येवर या प्रभागात नागरिकांची समाधान असल्यामुळे जालना शहरातील मुख्य वस्तीत असणाऱ्या या प्रभागाची वाटचाल आदर्श प्रभागाकडे चालली होत आहे. प्रभागातील नागरिक विकास कामामुळे सर्व आनंदित आहे. पुढील विकास कामासाठी एडवोकेट शैलेश देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी राहुल परदेशी आकाश चव्हाण सोनुभाऊ करण वानखेडे
आदर्श शिक्षिका सौ पुष्पा गायकवाड सौ देशमुख ताई सौ साखरे ताई सौ दुर्गाताई सौ सुनिता वडे सौ नाईक ताई सौ तायडे ताई सौ इगारे ताई उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका सौ संध्या देठे यांनी केले तर आभार राहुल परदेशी यांनी मानले