पुनाडे गावात शिवजयंती उत्साहात साजरी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण तालुक्यातील पुनाडे गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संघटना आणि देवेंद्र पाटील आणि परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस राष्ट्रवादी प्रशांत पाटील तसेच समाधान म्हात्रे ( युवक राष्ट्रवादी अध्यक्ष ), मंथन सुतार- पेस्टमोटम कंट्रोल मॅनेजर,ना.क.पाटील गुरुजी,राघो पाटील गुरुजी,एड. रुषाली पाटील, महादेव पाटील, क्रुष्णा डाकी सामाजिक कार्यकर्ते ,मारुती डाकी, जयेश पाटील, जनाबाई पाटील गावदेवी महिला मंडळ अध्यक्षा,प्रिती पाटील सद्गुरू आज्ञा महिला बचत गट अध्यक्षा, लीलाबाई पाटील, प्रणाली डाकी, श्वेता डाकी, स्नेहल पाटील, दिनेश पाटील,अमित ठाकुर, गणेश वामन पाटील,राहूल घरत ( जोहे ),प्रिया पाटील,चरण पाटील ( रावे) रविंद्र गावंड ( पिरकोन) प्रगती पाटील, संदेश पाटील,जानकी पाटील सुवर्णा तांडेल ( पारगाव) कु.यश पाटील , काशीबाई खारपाटील ( चिरनेर) तसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुनाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट (पक्षाचे) महाराष्ट्र प्रभारी सरचिटणीस राष्ट्रवादी प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच प्रशांत पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांच्या कार्याचा कौतुक करत त्यांचा सत्कार केला.शिवाजी महाराजां बद्दल ना.क.पाटील गुरुजीनी सविस्तर व उत्तम माहिती दिली. लव जिहाद मुळे हिंदू मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना कसं वाचवता येईल ह्याची सुंदर माहिती ऍड.रुषाली पाटील यांनी दिली.या कार्यक्रमाला केळवणे गावचे शिवप्रेमी चेतन मोकळं हे सुध्दा कार्यक्रमाला उपस्थित होते.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर प्रशांत म्हात्रे ( कडापे) ह्यांनी केले. श्री समर्थ कृपा निवासस्थानी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.