उरण नगरपरिषद हद्दीतील श्री.हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील प्रतिबंधित डंपिंग ग्राउंडच्या जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात असल्याची गंभीर बाब नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांनी उघडकीस आणली आहे.
प्रमिला पवार यांनी मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर डंपिंग ग्राउंड मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही काही अज्ञात व्यक्तींकडून खाजगी जागेवर बेकायदेशीररित्या कचरा टाकला जात आहे. हा कचरा NAD (नेवल आर्मामेंट डेपो) मधून कचरा भरलेली गाड्यांद्वारे आणून टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा प्रकार केवळ पर्यावरणाचे नुकसान करणारा नसून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा आहे, असे प्रमिला पवार यांनी नमूद केले.या प्रकरणी तातडीने खातरजमा करून कठोर कारवाई करण्याची मागणी प्रमिला पवार यांनी केली आहे. सदर पत्राच्या प्रती नगराध्यक्ष, उरण नगरपरिषद व पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांनाही माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
नगरसेविका प्रमिला पवार यांच्या प्रमुख मागण्या:-
१) सदर जागेची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून खाजगी जागेवर विना परवानगी बेकायदेशीर कचरा टाकणे त्वरित थांबवावे.
२)या बेकायदेशीर कृत्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ एफ.आय.आर. (FIR) दाखल करावा.
३) जर हा कचरा एन ए डी मधून येत असेल, तर त्यांनाही या कायदेशीर उल्लंघनाबाबत लेखी कळवावे आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल द्यावा.
निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी साजरा.
1 day ago
खानदेश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार.
1 day ago
एससी उपवर्गीकरणाविरोधात जाफ्राबाद येथे २८ जुलै रोजी विराट जनआक्रोश मोर्चा समन्वय समितीने केले एस.सी प्रवर्गातील नागरिकांना हजारोंच्या संख्येने सहभागाची होण्याचे
1 day ago
इंदेवाडी पाणी टाकी ते गोकुळधाम सोसायटी रस्त्याचे उद्घाटन संपन्न!
2 days ago
सासरच्या जाचाला कंटाळून जवयाने केली आत्महत्या
2 days ago
खासदार डॉ. कल्याण काळे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची जाफ्राबाद येथील साखळी उपोषणस्थळी भेट
2 days ago
झेडपी शाळा, रस्त्यांची दुरवस्था; लोकप्रतिनिधींवर गावकरी संतप्त निवडणुकांपुरतीच कामे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
2 days ago
बुलढाणा अर्बन शाखेत शाखा अधिकारी म्हणून वैभव कुलकर्णी रुजू. व्यापारी महासंघाच्या वतीने स्वागत.
2 days ago
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव; सुयश कॉलेज ऑफ फार्मसीत दीक्षांत समारंभ उत्साहात