pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.10

राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धां जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना निवासासह भोजनाची उत्तम सोय उपलब्ध करुन द्यावी तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
राज्यस्तरीय शालेय खो-खो व बेसबॉल स्पर्धा आयोजनाबाबतची पुर्व तयारी आढावा बैठक शुक्रवार दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुला-मुलींना विभागनिहाय वेगवेगळ्या रंगाचा ट्रॅकसुट उपलब्ध करुन देण्यात यावा तसेच ट्रॅकसुटवर सुस्पष्ट विभागनिहाय नावे मुद्रीत करावी. विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या पारितोषिकात नामांकित कंपनीच्या स्पोर्ट वॉचचा समावेश करावा. तुमच्या डोक्यात काही नवनवीन संकल्पना असल्यास मला सांगा, त्यांचाही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी वर्ष 2023-24 या वर्षात 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धां जालना शहर महानगरपालिकेजवळील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये दि.22 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तसेच वर्ष 2023-24 या वर्षात 17 वर्षाखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धां दि.30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुर्व तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले. सन 2022-23 मध्ये 49 खेळाच्या जिल्हास्तरीय, 11 खेळाच्या विभागस्तरीय व 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या सॉफ्टबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठक यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे