pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशी करा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0 1 7 2 3 2

बुलढाणा/प्रतिनिधी, दि.12

कोविड काळात जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. मात्र खरेदी करण्यात आलेले साहित्य रुग्णालयाच्या त्या – त्या कक्षामध्ये निदर्शनास येत नाही.या वैद्यकीय साहित्य खरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.तरी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी आज १२ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

निवेदनात नमूद आहे की, जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथे कोविड काळात विविध प्रकरची खरेदी करण्यात आली त्यामधील ICU मध्ये पलंग खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आले परंतू ज्या पलंगाची खरेदी त्या विभागमध्ये दाखविण्यात आली ते पलंग त्या ठिकाणी नाहीत. याबाबत 11 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात पत्राद्वारे विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रथम अपील दाखल केल्यानंतर 20 मार्च 2023 तारीख देण्यात आली. मात्र सुनावणी पुढे लांबविण्यात आली.त्यानंतर 28/03/2023 रोजी ज्या विभागाच्या संदर्भात अपील होती त्याच विभागाचे अधिकारी रजेचे अर्ज ना मंजूर असून सुध्दा रजेवरती राहले.

तरी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, भंडारपाल व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच शासनाचा हडपलेला निधी वसूल करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरुन तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे