शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

जालना/प्रतिनिधी,दि.3
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे दि.6 जुन 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास जालना शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या आर. एस. शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील जवळपास 1 हजार 17 आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास जालना जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सुरेश केसापूरकर, चंद्रशेन कोठावळे व संजय काळबांडे हे उपस्थित राहणार आहेत. व्याखानमालेमध्ये नागरिकत्व आणि शिष्टाचार, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटूंब प्रबोधन व स्वदेशी विचार व संकल्पना इत्यादी विषयावर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समितीचे सर्व उद्योजक उपस्थित राहणार आहे. असेही कळविले आहे.