बदनापूर येथील NMMS परिक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर यांची भेट
बैठक व्यवस्था पाहून केले समाधान व्यक्त.

जालना/प्रतिनिधी, दि.22
महाराष्ट्र राज्य परीक्षा( NMMS) परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती परीक्षा आज राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली.
आज (दि.22) बदनापूर तालुक्यातील बदनापूर येथील मथुरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या हायस्कूल बदनापूर येथे बदनापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर डी. एन. यांनी भेट दिली असता केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू होती या दोन्ही मथुरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या हायस्कूल बदनापूर या केंद्रावर एकूण 351परीक्षार्थीपैकी 350 परीक्षार्थी व कन्या हायस्कूल बदनापूर येथे 351 परीक्षार्थीपैकी 348 परीक्षार्थीनी आज परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर डी. एन.यांनी सांगितले.
मथुरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या हायस्कूल बदनापूर या केंद्रावर केंद्रासंचालक म्हणून जालमसिंग चुंगड यांनी काम पाहिले तर कन्या हायस्कूल बदनापूर या केंद्रावर ठवरे सर यांनी काम पाहिले.