बिरोबा महाराज यात्रेनिमीत्य विविध स्पर्धेसह यात्रेची सांगता
आमदार जवळगावकर , कोहळीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.6
पळसा येथील ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रेनिमीत्य आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमासह शंकर पट, मॅरेथान स्पर्धा, कब्बडी , क्रिकेट स्पर्धेत मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली असल्याने स्पर्धेत चांगलाच प्रतिसाद मिळाला. लहाडी लोटांगण यात्रेनिमीत्य गावकरी परिसरातील भक्त मंडळीसह लेकीबाळी यांच्यासह आमदार जवळगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, संभाजीराव लांडगे विवेक देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पुणे , शिवा वानखेडे मानवाडीकर अक्षय पवार बामणीकर गजानन अनंतवार कवानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीनी उपस्थिती लावली.
तर आमदार जवळगावकर यांनी पळसा भेटीत बिरोबा महाराजाचे दर्शन घेत आपल्या स्थानीक विकास निधीतुन माळावर केलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तर उर्वरित काम लवकरच पुर्ण करणार असल्याचे सांगीतले.आमदार जवळगावकर यांनी आबादीतील बिरोबा महाराज युवक मंडळीसह ग्रामस्थांकडून मंदिराचा केलेल्या कायापालटाचे कौतुक व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष आनंदराव भंडारे ,सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव , संदीपराव कालबांडे,रंगराव मस्के,कुबेरराव राठोड,जयप्रकाश मस्के , सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे , दहिभाते ज्ञानेश्वर हाराळ, शिवप्रसाद विनोद निमडगे उपस्थित होते.