pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कोषागार विभागाचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0 3 2 6 6 6

जालना/प्रतिनिधी,दि.12

लेखा व कोषागारे संचालनालय तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन सुरु करणे, निवृत्ती वेतन बंद करणे निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरीक्त रक्कम वसूल करणेच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोन अथवा मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉटस अॅपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरुन निवृत्तीवेतन बंद होऊ नये. याकरीता लिंक ओपन करुन फॉर्म भरण्याबाबत कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यांस निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारामार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरीता पत्रव्यवहार केला जातो. तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी पंजाब पुंडगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे