pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

‘वारी पंढरीची’ – नवकवी दत्ता वडगावकर

0 1 2 1 1 2

।। वारी पंढरीची ।।

संत होता येत नाही,
संत जन्मावा लागतो..।
घाव दुर्जनाचा अंगी,
संता सोसावा लागतो ॥

ज्ञाना-तुकाचा महीमा,
जगी कसा तो वर्णावा ।
तया ठायी सदा असे,
दुर्जनाशी तो गोडवा ॥

पंढरीच्या त्या वारीचे,
नाही कोणा निमंत्रण ।
विठुराया भेटीसाठी,
चाले लाखो भक्तजन् ॥

पंढरीच्या त्या वारीत,
नाही कोणी अजा दुजा ।
असा संतांचा मेळावा,
जगी कोठे नाही दुजा ॥

वारी पंढरीची चाले,
देहभानं विसरून..।
जणू धरती स्वर्ग वाटे,
आनंदले भक्तजन् ॥

विठुराया दंग झाला,
असा सोहळा पाहुन ।
तया ज्ञाना-तुका दिसे,
भक्तांसवे वारीतून ॥

भक्तजणाच्या अंतरी ,
असा अंकूर रूजावा ।
तया अंतरीचा कोंब,
माझा विठ्ठोबा असावा ॥
माझा ज्ञानोबा असावा ॥
माझा तुकोबा असावा ॥

डी. के. वडगांवकर
राजगुरूनगर ता. खेड. जी. पुणे
मो. ९८२२०९४८६७
राजगुरूनगर

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2