हदगांव तालुका लिंगायत समाज बांधवाकडुन खोटा गुन्हा रद्द करण्याची मागणी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.4
धर्माबाद तालुक्यातील लिंगायत समाजातील तरुण हनुमंत कत्ते यांचे बॅनर प्रिंटिंग चे दुकान आहे.त्यांनी बॅनर छापलेले नसताना जाणीवपूर्वक जातीय सुढ बुद्धीने अठ्ठावीस जुन रोजी धर्माबाद पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी हदगांव तालुक्यातील लिंगायत समाज बांधवाकडुन गुरुवार चार जुलै रोजी हदगांव तहसील कार्यालया मार्फत वरिष्ठांना लेखी निवेदनातून व्यक्त केली.
यावेळी वीरशैव शिवा संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविता निमडगे पळसेकर , नंदु चिंचोलकर,मनोहर चिंचबनकर रामेश्वर घुसे एकराळा, शिवानंद मुळावकर, पार्वतीबाई चिंचोलकर , कांता चिंचोलकर पळसेकर यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.