वंचित बहुजन आघाडीचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
मागण्या मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

जालना/प्रतिनिधी, दि.6
बदनापूर: येथील वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे यामध्ये खालील नमुद केलेल्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात कराव्यात. नसता बदनापूर तहसिल कार्यालय जवळ जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बदनापूर तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोबडे यांनी मा.जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सविस्तर मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
मागणी क्र.१ – शेतकरी आज संकटात आहे शेतीमालाला भाव मिळत नाही व शेतकरी 7/04/20१९ आत्महत्या करत आहे तसेच शेतकरी यांच्यावर आसमानी संकट काही थांबता थांबत नाही. यातच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात आले पिक विमा कंपन्या पिक विमा देत नाही. महसूल अधिकारी त्यावेळेवर पंचनामा करत नाही. म्हणून शेतकरी यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी व पिकविमा मागील पिकाचा बदनापूर देण्यात यावा व बदनापूर तालुकयातील बोगस पिकविमा भरणारे पिकविमा केंद्रे व पिकविमा कंपण्याचे अधिकारी यांचे लागे भाधे असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्याचे यामध्ये नुकसान होत आहे. म्हणून याची सखोल चौकशी करुन जो कोणी अधिकारी व कर्मचारी व शेतकरी व आजून कोणी आढळल्यास कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
मागणी क्र.२ बदनापूर पंचायत समिती अंतर्गत योजनेच्या बोगस कारभार गटविकास अधिकारी यांचा धाक नसल्यामुळे संबंधीत कर्मचारी आपली मनमानी करतात व लाभार्थी यांना टाळाटाळ करतात व पैसे दिले तर काम करतात मग ते रमाई घरकुल व पीएम आवास आसो की, यशवंतराव होळकर घरकूल, बिरसामुंडा, शबरी आवास या सारख्या अनेक घरकुल योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी विस ते तीस हजार रुपये द्यावे लागतात. दिले नाही तर काम होत नाही याची सखोल चौकशी करून संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी ही नम्र विनंती आहे.
मागणी क्र.३ गायरान जमीनी संबंधीत धारकास सात बारा नावावर करुन देण्यात यावा व भूमिहिन शेतकऱ्यांना कमीत कमी पाच एक चा सातबारा देण्यात यावा याचा शेतकऱ्याकडून सरकारी चलन भरुन ध्यावे व सातबारा त्या शेतकऱ्याच्या नावाने करुन देण्यात यावे त्या शेतकऱ्याची जात न पाहता तो भूमिहिन आहे का हे पाहावे आणि त्याला सातबारा देण्यात यावे ही नम्र विनंती.
मागणी क्र.४ गट ग्रामपंचायत काजळा पानखेडा या रोडवर जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा आहे त्या लगत काही गावठाण आहे ते गायरान चा गट क्र. २२९ व गट नं. ६९ हे गायरान एस.सी. व ओपन मराठा समाजाच्या भूमीहिन शेतकऱ्याच्या ताब्यात होती. त्या शेतकऱ्यांना दम दाटी करून ती जमीन सिंहगड आणि रायगड आणि अजुन एक नाव माहित नाही या शाळेच्या नावाने सदर जमीन ताब्यात घेतली आहे. यामध्ये महसूल व काही गावातील पुढारी सामील आहे. या तिन्ही इंग्लिश स्कुल बोगस आहे. याचा जिल्हा परिषद कडे एक विनंती आहे. याची चौकशी करुन गायरान जमीन विकणारा व घेणारा व त्या दोन्हींना सहकार्य करणाऱ्या सर्वांवर शासनाची मालमत्ता विकणे व त्यामधून पैसे कमवणे या आजून काही यात दोषी आढळल्यास त्या सर्व दोशीवर सरकारी मालमत्ता हाडप करणे व विकणे याच्या अंतर्गत कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे ही नम्र विनंती.
मागणी क्र.५ जल जिवन मिशन अंर्तगत बदनापूर तालुकयात गेल्या तीन वर्षापासून चालू आहे या सर्व गावामध्ये कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केले आहे ह्या योजनेचा जनतेला एक टक्काही लाभ अजुन मिळाला नाही. हा सर्व पैस जनतेचा आहे. आणि ही योजना जनतेसाठी आहे. याचा लाभ जनतेला कधी व किती महिन्यात मिळणार आहे व ज्या गावच्या कंपनीच्या नावाने आहे त्या कंपनीच्या मालकाला याचा जाब विचारून त्याच्यावर व कायदेशीर कार्यवाही करावी. व जनतेला याचा लाभ लवकरात लवकर करून देण्यात यावे ही नम्र विनंती आहे.
या सर्व मागण्या मान्य लवकरात लवकर मान्य करावे व आम नागरीक या योजनेपासून वंचित राहू नये आणि सर्व संबधीतावर चौकशी करुन जे काही दोषी असेल त्या सर्वांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याचा पाठपुरावा करून या सर्व जनतेसाठी रस्त्यावर उतरुन याचा निशेद केल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी पुढील काळात आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा जालना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.