pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान-उद्योजक सुनिलभाई रायठ्ठा

 बारा कर्तबगार महिलांसाना हिरकणी पुरस्कार प्रदान

0 1 1 8 1 3
जालना/प्रतिनिधी,दि.29
भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि शेतीच्या कामात महिला जास्त राबतात. शिवाय या देशाच्या पुर्ण विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन सुनिलभाई रायठ्ठा यांनी हिरकणी महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलतांना केले.
दि. 28 मे 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुना जालना येथे उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिरकणी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यातील कर्तबगार बारा महिलांना हिरकणी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. सुनिलभाई रायठ्ठा म्हणाले की, या देशात दारु हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यातुन महसुल मिळत असल्याने सरकार सुध्दा त्यावर बंदी घालण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे महिलांनीच आता दारुबंदीसाठी पुढे आले पाहिजे. हिकरणी महोत्सव हा महिलांना प्रेरणा देणारा ठरत आहे. त्यामुळे कर्तबगार महिलांना उजेडात आणले जात आहे. परंतु, ज्या महिला कर्तबगार आहेत, परंतु, त्या पुढे आल्या नाहीत त्यांनाही हिरकणी महोत्सवाच्या माध्यमातून पुढे आणले पाहिजे असेही सुनिलभाई रायठ्ठा यांनी म्हटले. यावेळी महिलांसाठी प्रबोधनात्मक सांस्कृतीक कार्यक्रमासह मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर तसेच अंधश्रध्दा निर्मूलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच एकल आणि निराधार महिलांसाठी शासकीय योजनांचे विविध अर्ज उपलब्ध करुन गरजु महिलांना त्याचे वाटप करुन मार्गदर्शन करण्यात आले. या हिरकणी महोत्सवात भारुड, पोवाडा, लावणी चे सादरीकरण करण्यात आले तर उपस्थित महिलांमधून 3 महिलांना लक्की ड्रॉ करुन पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या. प्रमुख पाहुने म्हणून सर्पमित्र प्रतिभा ठाकरे, अ‍ॅड. अश्विनी धन्नावत, सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर, वैशाली सरदार, अ‍ॅड. रिमा खरात, शाहीर आप्पासाहेब उगले, आयोजक करुणा मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. करुणा मोरे, सौ. रोहिणी बळप, सौ. सविता काळे, कोमल उगले, कांचन उगले, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अच्युत मोरे व कांचन शिंदे यांनी केले.
या कर्तबगार महिलांचा हिरकणी पुरस्काराने झाला सन्मान
आकोला येथील सर्पमित्र प्रतिभा ठाकरे, ठाणे येथील विद्या गडाख, अहमदनगर येथील अनिता काळे, सांगली येथील माधवी माळी, रायगड येथील प्रमिला पवार, सातारा येथील रेखा पवार, जालना येथील कु. संजिवनी पुरी, अनिता भालतिलक, अ‍ॅड. अश्विनी धनावत, सावित्रीबाई उगले, महिला पो. काँ. लक्ष्मीबाई वळगे, अ‍ॅड. रिमा काळे-खरात यांचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 3