अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील 19 जून रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर
4 हजार 125 लाभार्थ्यांना 280 कोटींचे कर्ज वितरीत
जालना/प्रतिनिधी,दि.18
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यान्वित व्याज परतावा योजनांचा तालुकानिहाय व जिल्हानिहाय आढावा घेण्याकरिता, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) हे बुधवार, दि. 19 जून, 2024 रोजी जालना जिल्ह्यात येत आहेत.
श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 3.00 वाजता जिल्ह्यातील महामंडळाच्या विविध लाभार्थ्यांना ते भेटणार आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात 92 हजार 144 लाभार्थ्यांना विविध बँकांनी रुपये 7 हजार 330 कोटींचे व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे. तर महामंडळाने रुपये 768 कोटी पेक्षा अधिकचा व्याज परतावा 84 हजार लाभार्थ्यांना दिला आहे. जालना जिल्हयातील 4 हजार 125 लाभार्थ्यांना विविध बँकांनी रुपये 280 कोटींचे व्यावसायिक कर्ज वितरीत केले आहे. तर महामंडळाने रुपये 35 कोटी पेक्षा अधिकचा व्याज परतावा 3 हजार 331 लाभार्थ्यांना दिला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील व्यक्तीश: योजनातंर्गत लाभार्थ्यांना असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी जालना जिल्ह्यात येत आहेत. बैठकीस जिल्ह्यातील बँकर्स व बँकेचे जिल्हा समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत.