बरडशेवाळा आरोग्य केंद्रा अंतर्गत पल्स पोलीस लसीकरणाला चांगला प्रतिसाद

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.3
केंद्र राज्य शासनाच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत व सिईओ मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य सेवक कर्मचारीवर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांच्या सहकार्यातून रविवार तिन मार्च रोजी हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे वैद्यकीय अधिकारी डॉ.के.सी.बरगे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहा वयोगटापर्यतच्या बालकासाठी लसीकरण केंद्रावर आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेत चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.के.सी.बरगे अंबाळा, गोर्लेगाव पिंपरखेड आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरेवार डॉ.आशीष बेरळकर,डॉ.विजय कानोडे, औषध निर्माण अधिकारी ,आरोग्य सहाय्यक सहायिका , कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य सेवक सेविका , अंगणवाडी सेविका मदतनीस आशासेविका कर्मचारीवर्गासह सामाजिक कार्यकर्ते आंनदराव मस्के , सवीता निमडगे पळसेकर , प्रभाकर दहीभाते आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .