जिल्ह्यात 26 व 27 मार्चला ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि.25
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव 26 व 27 मार्च रोजी जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, टाऊन हॉल येथे पार पडणार आहे.
यावेळी ग्रंथोत्सवास पर्यावरण व वातावरणीय बदल, पशु संवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणुन खासदार कल्याण काळे, खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार सर्वश्री सतीष चव्हाण विक्रम काळे, राजेश राठोड, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहा. ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर, जिल्हा ग्रंथालय असो. अध्यक्ष डी.बी. देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष राजेश राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. तर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कवी डॉ. ललित अधाने यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
बुधवार दि.26 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथ दिंडी ने ग्रंथोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव-2024’ चे उदघाटन होणार आहे. दूपारी 2.00 वाजत परिसंवाद तर दूपारी 3.30 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि.27 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता परिसंवाद तर दूपारी 2.00 वाजता कथाकथन कार्यक्रमा होणार आहे. तसेच दूपारी 4.00 वाजत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी ग्रंथोत्सवास विविध कार्यक्रमांना साहित्यिक आणि कवी यांची उपस्थिती राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.