नेहरू विद्यालयात काव्य गायन स्पर्धेचे आयोजन

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.24
आज नेहरू विद्यालय गोलापांगरी येथे इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांची वाङमय विभागा अंतर्गत काव्य गायन स्पर्धेचे आयोजन केले होते.
अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडील, निसर्ग, निसर्ग चित्र, देशभक्तीपर,
पाऊस, आकाश, पशु ,पक्षी, प्राणी अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी कविता गायन करून अनेकांची मने जिंकली.
श्रीयुत पी.डी. पांचाळ सर यांनी आपल्या संयोजकीय मनोगतात *माझी शाळा* ही कविता गाऊन विद्यार्थ्यांसमोर शाळेचा व गुरुजनांचा आदर्श समोर ठेवला.
श्रीयुत प्राध्यापक बकाल सर, श्रीयुत ठाकरे सर व श्रीमती पाटील मॅडम यांनीही आपल्या स्वरचित कविता गाऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन सोबतच प्रबोधन केले.
वांङ मय विभाग प्रमुख श्रीयुत धांडे सर यांनीही राजकीय पटलावर एक कविता गाऊन विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रात ही माहिती घ्यावी असे आपल्या कवितेतून बोध दिला.
शाळेचे पर्यवेक्षक श्री आत्माराम मोरे सर यांनी अध्यक्ष मनोगतात दिवंगत ना. धो. मनोहर यांची कविता गाऊन विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला.
श्रीयुत पांचाळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.