आदर्श इंग्लिश स्कूल जामखेड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवा निमित्त अभिवादन.
सावित्रीच्या लेकिना बालिका दिनाच्या औचित्याने लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन

अनिल भालेकर/अंबड,दि.03
भारतमातेच्या कुशीतील विषमता,अंधश्रद्धा, असिक्षितपणा,समाजातील ढोंगीपण,गोरगरीबावर होणाऱ्या अत्याच्याराच्या विरोधात लढा उभारणाऱ्या,समतेच्या विचाराचे बिजारोपण करणाऱ्या जोतिबांची ज्योत सावित्रीमाईस जयंती निमित्य आदर्श इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागाने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अजरामर कार्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात इतिहास अधोरेखित केला. सहशिक्षिका सौ.वर्षा मॅडम व सहशिक्षिका सौ. निळेकर मॅडम यांनी अवघ्या एका दिवसात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सादर केलेली नाटिका स्वरूपात फुले दांपत्याचे कार्य पाहून सर्व विद्यार्थी, मान्यवर अचंबित झाले. सहशिक्षिका सौ. मुळे मॅडम यांनी विद्यार्थिनींना अमूल्य मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित गीतावर विद्यार्थिनींनी केलेले अप्रतिम नृत्य कलाविष्कार लक्षवेधी ठरले. उपस्थित मान्यवरांच्या वतीने या नृत्य कलाविष्कारास कौतुकाची थाप म्हणून बक्षीस स्वरूपात रक्कमही देण्यात आली.
जयंती उत्सव निमित्य संस्थापक अध्यक्ष डॉ. गंगाधर पांढरे, संस्था सचिव आशाजी पांढरे, कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मस्के सर,प्राचार्य आर.आर वैद्य,मुख्याध्यापिका वैशालीजी खिलाडे, तुळजीराम पांढरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो याप्रसंगी विद्यार्थिनी पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने केलेली वेशभूषा अत्यंत लक्षवेधी ठरली.
जयंती उत्सव व बालिका दिन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका,शिक्षक,कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.